आव्होपा आयोजित कै. प्रा. सुनील वट्टमवार यांच्या स्मरणार्थ दहाव्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (एल पी उगिले)
आर्य वैश्य ऑफिसिअल अँड प्रोफेशनल असोसिएशन उदगीर आयोजित कै. सुनील वट्टमवार यांच्या स्मरणार्थ नगरेश्वर मंदिर उदगीर येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात तरुणांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे
यावेळी तब्बल 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यावेळी उद्घाटक राजेश्वरराव निटूरे हे होते तर प्रमुख पाहुणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, अमोल अनकल्ले, डॉ. तानाजी चंदावार, उद्योजक किशोर पंदीलवार, नाथा कोटलवार,प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर पारसेवार,प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार ,सचिव विजयकुमार गबाळे , कोषाध्यक्ष प्रा. राकेश पांपट्टीवार तसेच सुदेश मुक्कावार, विजयकुमार पारसेवार, अरुण सुरशेटवर,भरत वट्टमवार, डॉ.शेटकार,डॉ व्यंकटेश मलगे, आशिष अंबरखाने हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिर यशस्वी यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील प्रा. संजय सांगुळगे,संजय पत्तेवार, व्यंकटेश पारसेवार, आणि अनिल मारमवार, देविदास पारसेवार, अनिरुद्ध मुक्कावार, सुधाकर पंदीलवार, बालाजी पत्तेवार, ॲड बालाजी जगळपुरे, धनंजय गुडसुरकर, विठ्ठल बावगे, राजेंद्र पेन्सिलवार, सूर्यकांत मोतेवार, बालाजी बुन्नावार यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये सचिव विजयकुमार गबाळे यांनी उपस्थितांना संस्थेच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर पारसेवार यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले. राजेश्वरराव निटुरे यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले व त्यांनी संस्थेच्या उपक्रमास माझे कधीही सहकार्य लागले तर मी उत्स्फर्तपणे सहकार्य करीन असे अभिवचन दिले. सूत्रसंचालन विजयकुमार गबाळे सचिव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संजय संगुळगे यांनी केले.