म. बसवेश्वर जयंतीनिमित्त सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर संपन्न

उदगीर (एल पी उगिले) येथील वीरशैव समाज व श्री हावगीस्वामी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी श्री हावगीस्वामी मठ संस्थान येथे सर्वरोग निदान व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन श्री गुरू हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, वीरशैव समाजाचे कोषाध्यक्ष सुभाष धनुरे, भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, अमोल निडवदे, विजय निटुरे, आशिष आंबरखाने, कल्याण कपाळे, मनोज पुदाले, उत्तरा कलबुर्गे, राजकुमार हुडगे, प्रभुराज कप्पिकेरे, बाबुराव पांढरे, अँड. महेश मळगे, राम मोतीपवळे, रविंद्र हसरगुंडे, मनोहर लोहारे, सुनील हावा, संगम पटवारी, गुंडू समगे, मंदाकिनी जीवने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी श्री हावगीस्वामी युवक मंडळाच्या वतीने सिंहासनाधिष्ठ म. बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा लोहकरे यांनी केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या एक दिवसीय आरोग्य शिबीरातंर्गत विविध आरोग्य विषयक सर्व रोगनिदान व आयुर्वेदिक चिकित्सेच्या व नेत्र तपासण्या या सोबतच बालकांचे, स्त्रियांचे (श्वेतपदर व रक्तपदर) इत्यादी विविध आजारांवर शहरातील विविध हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
यावेळी अंबरखाने ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. एकुण २१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.
श्री. वरदविश्व आयुर्वेदीक हॉस्पीटल व पंचकर्म केंद्र लातूर यांच्या तर्फे माणदुखी, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधीवात, वाताचे अशा एकुण १२७ जणांची तपासणी करून मोफत औषधोपचार व सल्ला देण्यात आले.
त्याचबरोबर उदगीर लॅब असोसिएशन, उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या मार्फत ६० नेत्र तपासण्या व त्यातून २३ ऑपरेशन करण्यात आले. त्याचबरोबर शिबीरात १७ हृदय तपासण्या, १२ ईसीजी, ८ बालरोग तपासणी, ७२ स्त्रीरोग तपासणी श्रीदत्त हॉस्पिटल लातूर यांच्या मार्फत करण्यात आले.
हे सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी संगम समगे, संदीप उप्परबावडे, अजय कबाडे, सचिन कारामुंगे,आकाश समगे, सुमीत हाडोळे, प्रवीण उप्परबावडे, गणेश पटणे,शिवकुमार उप्परबावडे, नरसप्पा खंदारे, सुरेश आठाणे, कपील शेटकार, अमित खंदारे, अक्षय समगे, चंद्रशेखर कानमंदे, रामेश्वर स्वामी(खंदारे),
संगम उप्परबावडे, नागेश आठाणे,
सुनिता मठपती, शकुंतला समगे, श्रीदेवी खंदारे, शिवमाला समगे, सुरेखा मोदे, शिवनंदा हळ्ळे, अनिता नुक्ते, लक्ष्मीबाई स्वामी, कलावती आठाणे, प्रेमा खंदारे, सुरेखा समगे, प्रेमला समगे, सविता समगे, ज्योती समगे, मिना समगे, कलावती समगे, सुनीता भुसारे, जगदेवी मठपती, सुशीला हुडगे, रेखाताई कानमंदे, कल्पना कानमंदे, विद्यावती कानमंदे, विद्यावती बिरादार, संगीता स्वामी, रेश्मा कापसे, सुनीता आचारे, शरनम्मा दामरगित्ते, कुंभार माया, गनथडे मामा, कल्लप्पा अनारगट्टे, शांताबाई उप्परबावडे, चन्नु हैबतपुरे, जयाबाई अनारगट्टे, रेवम्मा उप्परबावडे, अशोक बिरादार, चन्नु बिरादार, महादेवी गौरशेट्टे, संदिप कानमंदे, रोहित कुरुपखेळगे, रोहित बिरादार, अभिषेक भरडे, शुभम हाडोळे, विकास भासगे, किरण कनशेट्टे, निखिल कनशेट्टे, सोमनाथ मुळे, ओम उप्परबावडे, रतिश उप्परबावडे, सतिश उप्परबावडे, प्रशांत उप्परबावडे, पवन उप्परबावडे,
सचिन कारामुंगे, अमर नुक्ते, शंकर ममदापुरे, पवन देवराय, आलोक नुत्ते, आविष्कार नुक्ते, दिपक कारामुंगे, विश्वेश पंचगल्ले, संगमेश्वर ममदापूरे, विश्वास पाटील, आकाश खानापूरे, संदिप उप्परबावडे, प्रविण उप्परबावडे, सुरज लासूने, निरज बिरादार, अभिषेक समगे, सचिन नागलगावे, हणमंत उप्परबावडे, रामेश्वर खंदारे, रोहित स्वामी, शुभम मोदे, सोमनाथ उप्परबावडे, गुरु उप्परबावडे, प्रमोद कानमंदे, राहुल अंजूरे, सागर कानमंदे,
गणेश पटणे, गणेश देवर्शे, शुभम समगे, शैलेश समगे, पप्पू मठपती, किशोर नारंगवाडे, अमोल कानमंदे, अभिषेक कानमंदे, अभि कानमंदे, केदार उप्परबावडे, मनोज समगे, अविनाश साखरे, मोहित अष्टूरे, अजय समगे, महादेव समगे, साई समगे, आकाश लासूने, नागेश समगे, गणेश समगे, विशाल समगे, महेश कानमंदे, पिंटू समगे, हावगीप्रसाद स्वामी,
अथर्व उप्परबावडे, विनोद उप्परबावडे, किशोर उप्परबावडे, शशीकांत कवठे, बस्वराज संगशेट्टे, प्रमोद समगे आदींनी परिश्रम घेतले.