वचन साहित्यातून महात्मा बसवेश्वरांनी प्रबोधनरूपी विचार पेरले – बालाजी मुस्कावाड

उदगीर (एल.पी. उगिले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात विश्वगुरु, समता नायक, महान संत, समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांची जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड म्हणाले, वचन साहित्यातून महात्मा बसवेश्वरांनी समाजात प्रबोधनरुपी विचार पेरले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, सतीश जगताप, उमाकांत नादरगे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
पूढे बोलताना बालाजी मुस्कावाड म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी भारतीय लोकशाही संसदेची स्थापना केली. त्यांनी मंगळवेढा येथे लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंडपाची स्थापना केली. या मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी, यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, महात्मा बसवेश्वरांचे साहित्य आपण वाचन करावे. वचन साहित्यात त्यांनी समता ,मूल्य ,न्याय, बंधुता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार ,नियंत्रण व शिस्त, सुशासन आणि प्रशासन इत्यादी बाबीवर सखोल विवेचन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत नादरगे यांनी केले तर आभार बालाजी कांबळे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, विजय कावळे, मारोती मारकवाड, प्रा. युवराज दहिफळे यांनी सहकार्य केले.