किनी यल्लादेवी ग्रामपंचायत मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील
किनीयल्लादेवी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जगतजोती समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच संतोष बिरादार, उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर, माजी सरपंच डॉ विष्णू कांबळे, जागृती विद्यालय चे मुख्याध्यापक सारंग भंडारे, गजानन बिरादार, जि.प. चे सहशिक्षक रणजित कानवटे, अण्णाराव मलशट्टे, गंगाधर मलशट्टे, पांडुरंग बिरादार, रामकिशन पाटील, धनंजय मलशट्टे, विजय बिरादार, परमेश्वर शेवाळे, बसवेश्वर बेटकर, प्रथमेश बेटकर, मनमत अप्पा शेवाळे , बालाजी शेवाळे, बालाजी बिरादार, वीरभद्र शेवाळे, संतोष बिरादार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी बिरादार ज्ञानेश्वर जाधव,निवृत्ती कांबळे, सुभाष कांबळे , रमेश गोडबोले, नागनाथ ससाने आदि ग्रामस्थांनी व लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले . महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिरादार यांनी केले तर आभार डॉ. विष्णू कांबळे यांनी मानले .