संजय गांधी निराधार योजना व वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कार्यालय तळमजल्यावर करा – मनसेची मागणी
उदगीर (एल पी उगीले) संजय गांधी निराधार योजना तसेच तस्सम वयोवृद्ध लाभार्थ्यांची संबंधित योजनेचे कार्यालय तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर केलेली आहेत. त्यामुळे वृद्ध लोकांना तीन मजल्याच्या पायऱ्या चढून कार्यालयात जावे लागते. जे वयोमानानुसार वृद्ध लाभार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वयोवृद्ध लाभार्थ्याची संबंधित कार्यालय प्रशासकीय बिल्डिंगमध्ये किंवा वयोवृद्ध लोकांना सहज जाता येईल अशा ठिकाणी तळमजल्यात करण्यात यावेत.असे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड,तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष संतोष भोपळे,शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक, मनविसे शहर उपाध्यक्ष रोहित बोईनवाड, संदीप भांगे, अनिकेत कोळी,ओमकार बिरादार, प्रसाद स्वामी, रोहित पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.
