मुरूमचे माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

0
मुरूमचे माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

मुरुम (प्रतिनीधी) : उमरगा तालुक्यातील मुरूम शहराचे माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.उमरगा जनता बँकेचे चेअरमन आणि भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुरूम शहरातील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. जवळपास 150 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याते आले.या कार्यक्रमाच अध्यक्षस्थान प्रमोद कुलकर्णी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून शरण बसवराज पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी श्री.जगन्नाथ गोशाळा च्या पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्मृतिशेष जे.टी.लिमये गुरुजी यांच्या आठवणींना विचारपीठावरील उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मलकुमार लिमये यांनी केलं तर शरण पाटील, प्रमोद कुलकर्णी,धम्मचारी धम्मभूषण आणि विश्वभूषण लिमये यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं.या कार्यक्रमाचे आभार आनंदकुमार कांबळे यांनी व्यक्ती केलं तर सूत्रसंचालन ख्याडे सरांनी केलं.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे,सुनीता मिरगळे,मंगल कचले,शिवाजी गायकवाड,रुपचंद गायकवाड,सी.एल.गोडबोले,अवेज ढोबळे,अमर भोसले,बाबा शिकलगर, अण्णाराव कांबळे, राहुल गायकवाड, प्रशांत मुरूमकर,राजू मुल्ला अमोल गोडबोले उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ सुदर्शन कदम,समीर सोमवंशी,पार्थ कदम,विशाल सोनवणे,अभिषेक कांबळे प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!