वर्षाराणी मुस्कावाड यांची अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या उदगीर तालुका महिला अध्यक्षपदी निवड
उदगीर (प्रतिनिधी) साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी ता उदगीर येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या “उदगीर तालुका महिला अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली आहे.
सदर पदाचा कार्यकाळ हा दि. 31 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांची निवड केल्यानंतर म्हटले, आपण आपल्या कुशलतेने साहित्य परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवाल व सुदृढ समाज स्वास्थ्य राहील यासाठी अविरतपणे कार्यरत रहाल, ही आपल्याकडून अपेक्षा आहे. आपल्या कार्याद्वारे सात्विक सुविचारांची पेरण करून समानतेचा मळा फुलवाल , ही खात्री आहे. आपणास नवीन जबाबदारीसाठी आभाळभर शुभेच्छा! मनोमंदिराच्या गाभाऱ्यात सदविचारांची सार्थकता अढळ राहो हीच प्रार्थना!
वर्षाराणी मुस्कावाड यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उदगीर तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर,प्रा . आशुतोष पाटील गोजेगावकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, प्रसिद्ध साहित्यिका अंबिका पारसेवार, अनिता येलमटे, नीता मोरे, प्रा.कुमार बंडे, प्रा. धनराज बंडे व इतर मान्यवरांनी केले आहे.
