नोकरीचे आमिष देऊन पैसे घेतले, पैसे परत करण्यास टाळाटाळ म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे : उच्च न्यायालय

0
नोकरीचे आमिष देऊन पैसे घेतले, पैसे परत करण्यास टाळाटाळ म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे : उच्च न्यायालय

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मयत व्यक्तीस नोकरीचे आमिष देऊन पैसे घेतले, सदर पैसे परत करण्यास टाळाटाळ म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे. असा निवाडा उच्च न्यायालयाचे न्या. विभा कणकणवाडी आणि न्या. सुशील घोडेश्वर यांनी दिला आहे.
फिर्यादी मीरा पेंडीले यांनी अहमदपूर पो. स्टे. येथे कलम ३०६ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीचा पती नवनाथ यास आरोपी यांनी दहा लाख रुपये मध्ये नोकरीचे काम करतो, असे आमिष दाखवले. नवनाथ याने आरोपी याना २०१४ मध्ये सहा लाख रुपये देऊ केले, परंतु आरोपीनी नवनाथ यास खोटा नियुक्ती आदेश दिला.सादर पैशाची मागणी फिर्यादीच्या पती ने केली असता, आरोपी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
सदर आर्थिक व्यवहारातून झालेल्या नुकसानीमुळे नवनाथ याने तणावामध्ये दिनांक ७ मे २०२२ रोजी आत्महत्या केली. या आशयाची फिर्याद नोंदवली. पोलीसानी तपासाअंती दोषारोप दाखल केले. सदर एफ आय आर आणि दोषारोप रद्द करण्यासाठी आरोपी यांनी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ऍड रेड्डी यांनी एफ आय आर मधील आरोपाचे यथास्थिती अवलोकन केले असता, आरोपीनी मायातास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपीनी केला हे प्रथम दर्शनी दिसून येत नाही. वादातीत नोकरी आणि रक्कम २०१४ सालच्या असून मयत व्यक्ती ने हयात असताना, आरोपी यांच्या विरुद्ध कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली नाही, तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयात कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. मयत व्यक्ती ला सर्व कायदेशीर पर्याय उपलब्ध होते, मयत व्यक्ती एफ आय आर मधील आरोपानुसार २०१८ मध्ये स्वगृही परतला आणि त्याने २०२२ मध्ये आत्महत्या केली, म्हणजे घेतलेली रक्कम आणि झालेली कथित फसवणूक यांचा मयताच्या आत्महत्येशी जवळीकता असण्याचे कसलेही कारण नाही. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी यांच्यामध्ये तडजोड झालेली असून फिर्यादी ने तिला सदर प्रकरण या पुढे चालवायचे नाही. या आशयाचे शपथपत्र फिर्यादीने उच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे.आरोपीने केवळ पैसे परत देण्यास केलेली टाळाटाळ हि कलम ३०६ च्या तरतुदी मध्ये बसत नाही, फिर्याद व दोषारोप यांचे संपूर्ण अवलोकन केले असता, आरोपीने कोणताही गुन्हा केला आहे, असे सिद्ध होत नाही. या आशयाचा युक्तिवाद केला.
उच्चन्यालयाने मयत व्यक्तीस नोकरीचे आमिष देऊन पैसे घेतले, सदर पैसे परत करण्यास टाळाटाळ म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा निवाडा देत संबंधित व्यक्ती ला इतर वैध मार्गाने पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे.परंतु सदर व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडला असल्यास प्रकरणातील सर्व तथ्य आणि घटना यांचा सारासार विचार केला असता, आरोपी चे सदर कृत्य कलम ३०६ च्या तरतुदी मध्ये बसत नाही. असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाचे न्या. विभा कणकणवाडी आणि न्या. सुशील घोडेश्वर यांनी दिले आहेत. तडजोड लपवल्यामुळे आरोपीना दण्ड केला असून दंडाची रक्कम उच्च न्यायालय विधी सेवा समिती मध्ये एक महिन्याच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणी ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी याचिकाकर्त्या तर्फे काम पहिले त्यांना ऍड. विष्णू कांदे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!