छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा सूर्यवंशी यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी स्नेहा सूर्यवंशी या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी (MH SET) 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला. ही परीक्षा 29 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत रसायनशास्त्र विभागातील स्नेहा सूर्यवंशी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एच.ए.तिरपुडे, डॉ अनंत टेकाळे, डॉ डी.बी.मुळे, प्रा.जी.जी.सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.तिचे अभिनंदन प्रा.शुभांगी पावडे, रसायनशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. तिला या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी.शिंदे व सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
