प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा. – प्रमोद राठोड

0
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा. - प्रमोद राठोड

लातूर (एल.पी.उगीले):- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत लातूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांची १ दिवसीय तालूकास्तरीय कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड, क्षेत्रीय अधिकारी यशवंत माने, जिल्हा संसाधन व्यक्ती धनंजय पवार, योजना लाभार्थी उद्योजक धिरजकूमार भनगीरे, मंडळ कृषी अधिकारी राजू येवले, अण्णाराव वाघमारे, श्रूतिका खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक उप कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे यांनी करताना लातूर तालुक्यातील यशस्वी उद्योजकांची माहीती दिली. उद्योगास भेटी देऊन तंत्रज्ञान अवगत करावे अशी माहिती दिली.जिल्हा संसाधन व्यक्ती धनंजय पवार यांनी सध्या सुरू असलेल्या व नव्याने करावयाची सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने ही योजना लागू केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची विस्तृत अशी माहिती आवश्यक कागदपत्रे, वित्त पूरवठा, अनूदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मातोश्री फूड चे संचालक धिरजकुमार भनगीरे यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला असून त्यांनी उभारलेल्या उद्योगाविषयी उपस्थितांना माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे यांनी केले तर आभार मंडळ कृषी अधिकारी अण्णाराव वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका तंत्र व्यवस्थापक सचिन हिंदोळे, सहायक अधीक्षक वर्षा मूळजे, सचिन पवार, गहिरवार, सूहास पिंपळे, प्रदीप पाटील, अश्विनी ढोबळे, समाधान सूर्यवंशी, अमोल राठोड, मंदाकिनी सूरवसे, पूजा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. लातूर तालुक्यातील अर्जदार शेतकरी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!