विद्यार्थ्यांची अभिरुची ओळखून शिक्षक त्यांना घडवत असतो- गजानन भातलवंडे
उदगीर (एल पी उगीले) शिक्षक हा विद्यार्थांची अभिरूची ओळखून त्यांना आकार देण्याचं काम सातत्याने करीत असतो. हे अभिमानास्पद पुण्यकर्म शिक्षकांच्या वाट्याला आल्याचा आनंद आहे.असे शिक्षकांबद्दल चे गौरवोद्गार पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार तर प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक संजय कुलकर्णी शिक्षकांबद्दल कृतज्ञतेची भावना प्रास्ताविकातून व्यक्त केली .
संस्था विकासात माझे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेतील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून अन्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी आपल्या मनोगतातून समाज घडविण्याचे काम , कुटुंबव्यवस्था, जबाबदार नागरिक व पुढील पिढीमध्ये संस्कार निर्माण करण्याचे काम शिक्षक करतो. शिक्षकांच्या छडीतून सुटलेला विद्यार्थी नंतर दुर्दैवाने तो आमच्या छडीत सापडतो .हे शिक्षण क्षेत्रातील कटू वास्तव मांडलं.
अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण नेमट तर आभार ज्ञानेश मातेकर यांनी मानले. गुणगौरव सोहळ्यात शिक्षक सत्कार वाचन पर्यवेक्षक कृष्णा मारावार माधव मठवाले व अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे यांनी केले .वैयक्तिक गीत मंजुषा रुद्रवार तर रुपाली थोरात यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोपासक मंडळ प्रमुख आशा गौतम, मीनाक्षी कस्तुरे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
