महिला सक्षमीकरणासाठी भाजपचा पुढाकार, जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्त्यांचा मान वाढला : उत्ताराताई कलबुर्गे

0
महिला सक्षमीकरणासाठी भाजपचा पुढाकार, जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्त्यांचा मान वाढला : उत्ताराताई कलबुर्गे

उदगीर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, सरोज वारकरे, माजी शहराध्यक्ष मनोजदादा पुराले, ॲड.दत्ता पाटील, अनिल मुदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून, हाळी हंडरगुळी मंडळाच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांना यामध्ये संधी मिळाली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तळागाळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि महिला नेतृत्व घडविण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाध्यक्षा उत्ताराताई कलबुर्गे यांनी यावेळी सांगितले.
नव्या कार्यकारिणीत अनुभवी महिला कार्यकर्त्यांबरोबरच तरुण व ऊर्जावान महिलांना स्थान दिले गेले आहे. यामुळे पक्षाच्या महिला मोर्चात नवचैतन्य निर्माण होऊन गावोगावी संघटनशक्ती वाढणार आहे.
पक्ष हाती घेत असलेल्या विविध अभियानांना नव्या कार्यकारिणीमुळे गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्त्यांमुळे उत्साहाचे वातावरण असून, महिला मोर्चाच्या पुढील कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याचे ही यावेळी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!