शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे महाप्रसादाचे भव्य आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे): शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठाण यांच्यावतीने गणेश विसर्जनाच्या निमित्ताने यंदाही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गणेशाच्या व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न.प. मुख्याधिकारी संतोष लोमटे, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर, महावितरणचे शहर अभियंता पंडित राठोड, पत्रकार प्रा. विश्वंभर स्वामी, वि.वि. कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजूभाऊ रेड्डी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी.बी. पाटील, सहायक अभियंता सुनील कासनाळे, सुधाकरभाऊ चेवले, आणि पत्रकार गोविंद काळे उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंजूषा लटपटे आणि प्रा. विश्वंभर स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
