अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; चुरशीच्या लढतीत मतदारांच्या कौलाकडे साऱ्यांच्या नजरा!

0
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; चुरशीच्या लढतीत मतदारांच्या कौलाकडे साऱ्यांच्या नजरा!

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, शहरात सध्या निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी आणि प्रचाराचा धडका सुरू आहे. १२ प्रभागांमधून प्रचारफेऱ्यांना सुरुवात झाल्याने अहमदपूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार, तर नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

​नगराध्यक्षपदाची लढत यंदा अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे, कारण या निवडणुकीत थेट आजी-माजी मंत्र्यांची कसोटी लागणार आहे. महायुतीमधील भाजपने यावेळी स्वतंत्र भूमिका घेत ॲड. स्वप्नील व्हत्ते यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले आहे. दुसरीकडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गटाचे उमेदवार अभय मिरकले, तर माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे समर्थक कलमोद्दीन अहमद शेख हेदेखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.

​या प्रमुख लढतींमध्ये महाविकास आघाडीचे खंदे समर्थक समजले जाणारे सय्यद साजिद कबीर यांची उमेदवारी डावलल्यामुळे त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या लढतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू जोडला गेला आहे. याशिवाय, नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार गायकवाड रमेश श्रीरंगराव, ओबीसी बहुजन आघाडीचे सिद्दिकी इरशाद अहेमद निसार अहेमद आणि अपक्ष उमेदवार ऋषीकेश हालसे हेदेखील निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. एकंदरीत, १२ प्रभागांमध्ये १०९ नगरसेवकपदाचे उमेदवार विविध प्रवर्गातून रिंगणात असल्याने सध्या अहमदपूरमधील लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले असून, मतदारांच्या अंतिम कौलाकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!