डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

0
डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

उदगीर (एल पी उगिले)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रक्षेत्र व्यवस्थापक डाॅ. प्रफुल्लकुमार पाटील यांना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीनजी पाटील यांचे हस्ते व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पदमश्री डाॅ. प्रकाशजी आमटे, डाॅ. मंदाताई आमटे, संचालक शिक्षण डाॅ. शिरीषजी उपाध्ये, संचालक संशोधन डाॅ. नितीनजी कुरकुरे, कुलसचिव श्रीमती मोना ठाकूर व इतर मान्यवर यांचे उपस्थितीत नागपूर येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डाॅ. पाटील यांना महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. याबाबत डाॅ. पाटील यांचे शेतकरी, पशुपालक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!