महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कुत्र्याच्या चाव्यापासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कुत्र्याच्या चाव्यापासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम

उदगीर (प्रतिनिधी): महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर नगर परिषद कार्यालयाच्या वतीने प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 अंतर्गत कुत्र्याच्या चाव्यापासून संरक्षण व रेबीज प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कुत्रा रागात असल्याची चिन्हे ओळखण्याबाबत माहिती देण्यात आली. कान पूर्णपणे मागे जाणे, दात दाखवत गुरगुरणे, संपूर्ण शरीर पुढे झुकलेले असणे, नजर न रोखता पाहणे अशी लक्षणे आढळल्यास कुत्र्याजवळ न जाण्याचा सल्ला देण्यात आला. अनोळखी कुत्र्यांना हात लावू नये, अचानक हातवारे करण्याचे टाळावे, कुत्रा चिडलेला दिसल्यास त्याला चिथावू नये, तसेच देहबोलीकडे लक्ष द्यावे. अशा महत्त्वाच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. मार्गदर्शन करताना डॉ. आदित्य राठोड यांनी रेबीजमुक्त भारत 2030 या उद्दिष्टाची माहिती देत कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जागरूकता गरजेची असल्याचे सांगितले. कुत्रा चावल्यावर तात्काळ कोणती काळजी घ्यावी, जखम स्वच्छ धुण्याचे महत्त्व आणि त्वरित लसीकरणाची प्रक्रिया याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश चौधरी यांनी केले. उपप्राचार्य एस. जी. कोडचे, प्रा. एस. वी. मुडपे, प्रा. प्रवीण जाहूरे, प्रा. शिवहर फुलवळकर, शिवशंकर मटके, प्रफुल्ल आदावळे, सिद्धीकी मिसबा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!