उदयगिरीच्या खेळाडूंची राज्यस्तरावर सुवर्ण कामगिरी

0
उदयगिरीच्या खेळाडूंची राज्यस्तरावर सुवर्ण कामगिरी

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

उदगीर (एल पी उगिले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे खेळाडू शुभम शिंदे आणि रोहन कोरे यांनी उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकाची घवघवीत कमाई केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या खो-खो संघासाठी या दोन्ही खेळाडूंची निवड झाली होती. दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान नांदेड विद्यापीठ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत प्रभावी व नेत्रदीपक खेळ सादर केला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आणि प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!