पोक्सो प्रकरणात मुख्य आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजूर

0
पोक्सो प्रकरणात मुख्य आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजूर

उदगीर (एल पी उगिले) छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे
न्या. सचिन देशमुख यांनी पोक्सो प्रकरणात मुख्य आरोपीला जामीन दिला आहे. प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, पीडिता यांनी दि. ०७/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्र. १८३/२०२५ अन्वये कलम ३३३, ७४, ७५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत तसेच पोक्सो कलम ८ व कलम १२ अंतर्गत आरोपी शिवलींग प्रभाकर चाळकापुरे व शकुंतला चाळकापुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणी तपासाअंती दोषारोप दाखल केल्यानंतर आरोपीने नियमित जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालय उदगीर येथे अर्ज दाखल केला असता सत्र न्यायालय उदगीर यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. सदर नाराजीने आरोपीने उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड.अजिंक्य रेड्डी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पीडितेच्या आईने दि.१६/०३/२०२५ रोजी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. सदर अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार केल्याबद्दल उल्लेख सदर पीडितेच्या आईने केलेला नाही. तसेच प्रथम खबर अहवालाचे अवलोकन केले असता, प्रथम खबर अहवाल हे अंदाजे २१ दिवसाच्या विलंबानंतर दाखल केलेली आहे. सदर विलंबानंतर दाखल केलेल्या प्रथम खबर अहवाला मध्ये आरोपीवर खोटा आरोप केल्याची दाट शक्यता आहे. तसेच केवळ किरकोळ भांडणाला पोक्सो च्या गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आल्याची शक्यता संपूर्ण कागदपत्रांचे व दोषारोपाचे अवलोकन केले असता नाकारता येत नाही. या आशयाचा युक्तिवाद उच्च न्यायालयासमोर मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्या.सचिन देशमुख यांनी सदर आरोपीला नियमित जामीन मंजूर केला. सदर प्रकरणी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!