अरुण उजेडकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहीर

0
अरुण उजेडकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहीर

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील साप्ताहिक अधोरेखित बातमीचे तालुका प्रतिनिधी तथा क्राईम लोकेशन 24 न्यूज युट्युबचे पत्रकार अरुण उजेडकर यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा दर्पण रत्न पुरस्कार, जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे अरुण उजेडकर यांचा सन्मान वाढला असून महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकारांमध्ये त्यांची गणना झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अरुण उजेडकर हे अत्यंत संयमी आणि शांत प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांचा मित्रवर्ग फार मोठा आहे. शासकीय, प्रशासकीय क्षेत्रातील बातम्या लिहिण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. विशेषत: भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले काम हे उल्लेखनीय आहे.
अरुण उजेडकर यांना एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवारातील एल पी उगिले, सुरेश बोडके, यांच्यासह विधीज्ञ जयवर्धन भाले, खाजाभाई शेख, डॉ. भातंबरे विपुल, नगरसेवक राजकुमार भालेराव, राजू गायकवाड, श्रीधर सावळे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!