जनतेच्या अपेक्षा पूर्ण करुन उदगीरला स्मार्ट सिटी करणार : आ. संजय बनसोडे

0
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करुन उदगीरला स्मार्ट सिटी करणार : आ. संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले): उदगीर शहराला सर्व सोयी सुविधा पुरवून महाराष्ट्रात उदगीर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी उदगीर शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती सचिन हुडे ह्या नगराध्यक्ष पदी निवडून दिले आहे, तर शहरातील २० प्रभागातील ४० उमेदवारांपैकी ३३ उमेदवार हे युती चे निवडून देऊन उदगीर शहरातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यात २० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर १३ भारतीय जनता पार्टी असे ३३ नगरसेवक शहरातील नागरिकांनी निवडून दिले आहेत. त्याबद्दल सर्व उदगीर शहरातील जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून नव्याने निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आ. संजय बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.
मागील ६ वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात उदगीरच्या जनतेने विश्वास दाखवुन विधानसभेत मला मोठे मताधिक्य या शहराने दिले आणि आज नगराध्यक्ष व नगरसेवक यांना भरघोस मते देऊन माझा मोठा सन्मान या शहरातील जनतेने केला असल्याने त्यांचे आभार व्यक्त करून निवडून आलेले सर्व उमेदवार हे उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस काम करून महाराष्ट्रात आपल्या उदगीरचे नाव करतील असा विश्वास आ.बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी माजी आ. गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे, सचिन हुडे, रामचंद्र तिरुके, पंडित सुर्यवंशी, प्रा श्याम डावळे, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, सय्यद जानीमियाँ,बाळासाहेब मरलापल्ले, अनिल मुदाळे, विजय निटुरे, चंद्रशेखर पाटील, रामदास बेंबडे, शिवशंकर पांडे, धनाजी मुळे, ज्ञानेश्वर बिरादार, बालाजी भोसले, रामराव बिरादार, उदयसिंह ठाकुर, दिलीप मटके, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, काजल मिरजगावे, यांच्यासह युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!