कौटुंबिक वादातून पत्नीने केला पतीचा खून; अहमदपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड केला बनाव

0
कौटुंबिक वादातून पत्नीने केला पतीचा खून; अहमदपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड केला बनाव

​अहमदपूर ( गोविंद काळे): तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून आणि गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत प्रकाश गायकवाड (वय ३६) असे मृताचे नाव असून, सुरुवातीला अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा प्रताप अहमदपूर पोलिसांनी आपल्या कौशल्याने उघड केला आहे.

​नेमकी घटना काय?

मयत प्रशांत आणि त्याची पत्नी अर्चना (वय ३०) यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून अर्चना दीड वर्ष माहेरी राहिली होती आणि पाच महिन्यांपूर्वीच ती पुन्हा सासरी नांदायला आली होती. बुधवारी (दि. १७ डिसेंबर) सायंकाळी अर्चनाने “पती बेशुद्ध पडला आहे” असा बनाव रचून दीर प्रवीण गायकवाड याला घरी बोलावले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला अर्चनाने “पती दारू पिऊन मारहाण करत असताना मी त्यांना स्वसंरक्षणार्थ ढकलले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला,” असा बनाव रचला होता.

​पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल

प्रशांतच्या शरीरावरील जखमा आणि गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला तसेच शवविच्छेदन अहवालात (PM Report) डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब साळवे, तानाजी आरदवाड, हणमंत आरदवाड, पद्माकर पांचाळ आणि विशाल सारोळे यांच्या पथकाने संशयित अर्चना हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अर्चनाने, पोलिसांनी तपासाचा कौशल्याने वापर करताच आणि पोलिसी धाक दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.

​असा केला खून

अर्चनाने कबुली दिली की, मागील भांडणाची कुरापत काढून तिने प्रशांत दारूच्या नशेत असताना त्यांचे डोके भिंतीवर आपटले आणि दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. मृताचा भाऊ प्रवीण गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

​उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे अहमदपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!