होमी भाभा परीक्षेत कोनाळे कोचिंग क्लासेसचे यश

0
होमी भाभा परीक्षेत कोनाळे कोचिंग क्लासेसचे यश

उदगीर (एल पी उगिले)
फक्त पाठांतर नव्हे तर विज्ञानातील प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आणि तार्किक विचारांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षणपद्धतीचे फलित म्हणजे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेतील कोनाळे कोचिंग क्लासेस, उदगीर यांचे नेत्रदीपक यश होय. परीक्षेच्या पहिल्या एम सी क्यू टप्प्यात संस्थेच्या इयत्ता 6 वी तील 9 व इयत्ता 9 वीतील 11 अशा एकूण 20 विद्यार्थ्यांनी यश मिळवत थेट प्रॅक्टिकल राऊंडमध्ये प्रवेश मिळवला आहे. संपूर्ण उदगीर परिसरातून असा भरीव निकाल देणारी ही एकमेव शैक्षणिक संस्था ठरली आहे.
इयत्ता 9 वी मधून हर्षवर्धन वडिकर (69), सर्वेश होनराव (68), नैतिक देशमुख (67), भक्ती देवनाळे (61), रुद्र पाटील (60), गणेश मोरे (59), अश्विन कप्पीकेरे (58), विरेन जाधव (57), गायत्री सावळे (56), संदेश तोडगीरे (54) व इंद्रायणी गाल्डे (52) यांनी गुणवत्ता सिद्ध केली.तर इयत्ता 6 वी मधून सोनाक्षी बाहेती (72), चित्रेश मटवाड (69), व्यंकटेश गुंड्रे (66), माहेश्वरी सोनटक्के (65) शिवम हसनाबादे (64), सात्विक जाधव (62), समर्थ केंद्रे (60), आरती भोकरे (60) व पृथ्वीराज जगताप (58) या विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकावला.

या यशामागे संचालक प्रा. व्ही. डी. कोनाळे ,श्री आबा कदम तसेच विज्ञान विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे काटेकोर नियोजन, नियमित चाचण्या, संकल्पना विषयक स्पष्टता आणि प्रयोगाधारित तयारी महत्त्वाची ठरली आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हेच संस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
या उल्लेखनीय यशामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत असून, प्रॅक्टिकल फेरीतही कोनाळे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी उज्वल यश संपादन करतील, असा विश्वास शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!