वीर बालदिवस शौर्य आणि त्यागाचे प्रतीक – गुंडेराव पाटील

0
वीर बालदिवस शौर्य आणि त्यागाचे प्रतीक - गुंडेराव पाटील

उदगीर (एल पी उगिले)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष गुंडेराव पाटीत होते. यावेळी विचार मंचावर संस्थेचे संचालक रामराव एकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहिबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी वीर बालदिवसाचे औचित्य साधून गुंडेराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून सिंग यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, शिख धर्माचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या दोन मुलांनी जोरावर व फतेह सिंग यांना मुस्लीम धर्मिय सैनिकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले.याबाबत विरोध केला म्हणून त्यांना भिंतीमध्ये घालून मारले. त्यांनी धर्मासाठी जे शौर्य आणि त्याग केले याचे प्रतीक म्हणून हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा केला जातो.या घटनेची आठवण पुढील पिढ्यांना रहावी म्हणून या दिवशी देशातील वीर बालकांना पुरस्कारही दिले जातात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख तथा मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.डी.बी.मुळे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!