जिव्हाळा ग्रुपच्या वतिने राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कृषि रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
उदगीर (एल पी उगिले) शेती व शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा ग्रुपच्या वतिने शेतीनिष्ठ शेतकरी अमृतराव देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली जिव्हाळा कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर लातुरच्या कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अनिल भिकाने व जिव्हाळा ग्रुपचे सचिव डॉ अशोक दारनुळे उपस्थित होते.
सदरील सोहळ्याची सुरवात काळया मातीत “मातीत.. तिफण चालते ….. ” या सुंदर शेतकरी गीताने विठ्ठलराव फुलसे यांनी केली. प्रास्ताविकात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यानी शेतकरी दिनाचे महत्व विषद केले .सदरील कार्यक्रमात सेद्रींय शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे कृषिभूषण ओमकार मसकल्ले ( महादेववाडी, देवणी), प्रगतीशील शेतकरी नंदकिशोर पाटील ( सताळा ता उदगीर ) व देवणी गोवंशाचे संवर्धन करणारे पशुपालक पटेल रज्जाक अली उस्मान अली (रा नेत्रगाव, ता उदगीर) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विकसित भारत -२०४७ अंतर्गत भारतीय शेतीचे जागतिकीकरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनाची भूमिका ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. शाश्वत शेतीसाठी गट शेती, सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींवर भर देवून पिक उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे असल्याचे डॉ.अनिल भिकाने यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. तर
शेतकऱ्यानी शेतीतील उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, बदलत्या हवामानानुसार पिक घ्यावे व शेतीला जल सिंचनाचे योग्य नियोजन करून पाणी द्यावे असे आवाहन डॉ बाबासाहेब ठोबंरे यांनी केले.
ओमकार मसकल्ले यांनी जिव्हाळा ग्रुपचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान भविष्यात अधिक जबाबदारीने, निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप अमृतराव देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रगतिशील शेतकरी लक्ष्मीकांत बिडवई तर उपस्थिताचे आभार दिलीप कंधारे यांनी मानले.
कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे डॉ अनंत शिंदे,डॉ अनिल कांबळे, डॉ पवनसिंह ठोंबरे, मजविपचे गोपाळराव कांबळे,जिव्हाळा ग्रुपचे देविदासराव नादरगे, रमाकांत बनशेळकीकर, सच्चीदानंद पुठ्ठेवाड, चंद्रकांत रोडगे , सुभाष तगाळे, पांडूरंग बोडके, शंकरराव साबणे, प्रा दिपक पाटील, शरणप्पा खेळगे, मनोहर खिंडीवाले, रामराव मोमले, वैजनाथराव पंचगल्ले, बाबुराव वाघमारे, चंद्रकांत उप्परबावडे, चंद्रकांत पांचाळ आदी उपस्थित होते.
