मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने एड्स जन जागृती रॅली

0
मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने एड्स जन जागृती रॅली

उदगीर (एल पी उगीले) ,येथील मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मातृभूमी नर्सिंग स्कूल च्या वतीने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक पांडूरंग दोडके व मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश ऊस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी, समुपदेशक शशिकांत महालिंगे,उमाकांत कांबळे, सोनकांबळे, रणजित पाटील, प्रा सय्यद उस्ताद ,प्रा रणजित मोरे, प्रा शितल पवार, प्रा शिवांगी वट्टमवार, काळे अस्विनी, प्रा काकरे प्रतीक्षा, ग्रंथपाल उषा सताळकर, रामकिशन भोसले, मादळे प्रदीप, दीपक रणदिवे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, संगीता दुडे, सय्यद सिमा, प्रकाश गायकवाड, जगदिशा ओंकारे,मुबारक पटेल, अर्चना बिरादार यांच्यासह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.
रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून जात छत्रपती शिवाजी महाराज चौक, सामान्य रुग्णालय येथून काढण्यात आली. समारोप मातृभूमी महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल, मातृभूमी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!