गोल्डन गेट पब्लिक स्कूल शाळेत ख्रिसमस डे साजरा

0
गोल्डन गेट पब्लिक स्कूल शाळेत ख्रिसमस डे साजरा

उदगीर (एल पी उगीले) येथील गोल्डन गेट पब्लिक स्कूल
शाळेत ख्रिसमस डे अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील सर्व मुले लाल रंगाच्या आकर्षक पोशाखात शाळेत आली होती. काही मुलांनी सांताक्लॉजचा वेश परिधान केला होता, त्यामुळे संपूर्ण शाळेत ख्रिसमसचा आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यपिका सौं वनिता सुगंधी यांनी ख्रिसमस डे चे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. प्रेम, आनंद, आपुलकी, दयाळूपणा आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेश देणारा हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती मुलांना सोप्या शब्दांत देण्यात आली. यामुळे मुलांना ख्रिसमस डे चा खरा अर्थ समजण्यास मदत झाली.
यानंतर मुलांनी ख्रिसमस गीतांवर उत्साहात नृत्य सादर केले. सर्व मुले आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला. केक कापून सर्व मुलांना केक वाटप करण्यात आले. सांताक्लॉज बनलेल्या मुलांनी सर्वांना शुभेच्छा देत आनंदाचे क्षण अधिक गोड केले.
अशा प्रकारे मुलांना ख्रिसमस डे साजरा करण्यामागचे महत्त्व समजावून देण्याच्या उद्देशाने हा दिवस शाळेत अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस सर्व मुलांसाठी आनंददायी व स्मरणीय ठरला. मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक व गोल्डन गेट पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन गेट पब्लिक स्कूलचे शैक्षणिक सल्लागार हैदर अली, मुख्याध्यापिका सौ.वनिता सुंगंधी, शाळा समन्वयक सौ. अंजुम शेख,सौ .दीपिका बिरादार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. निलंबिका पांचाळ,परीक्षा विभाग प्रमुख अंजली वडगावकर, सहशिक्षक सौ.अर्चना काळगे,सौ. लक्ष्मी वल्लपवाड ,अलविरा शेख, व्यवस्थापक विभाग प्रमुख सौ .स्वाती भांगे ,कांचन गिरी, कुशल बिरादार, शाळेतील सेविका या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला. सुंदर अशा या उपक्रमामुळे दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!