नगर परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार : नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे

0
नगर परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार : नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे

उदगीर (एल पी उगीले): उदगीरकरांनी मोठा विश्वास टाकत आपल्याला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, या संधीचे सोने करीत उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देत उदगीरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. स्वाती सचिन हुडे यांनी पालिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
उदगीर येथील शिवनंदा फँक्शन हॉल येथे आदिशक्ती महिला ग्रुपच्या वतीने नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांकडून निवडून आलेल्या महिला नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती हुडे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शिल्पा संजय बनसोडे होत्या. व्यासपीठावर सौ. प्रेमाताई राजशेखर पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रारंभी या कार्यक्रमामागच्या आयोजनाची भूमिका प्रस्ताविकातून महानंदा सोनटक्के यांनी विषद केली.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे म्हणाल्या की, उदगीरच्या मतदारांनी मोठा विश्वास टाकला आहे. या विश्वासास पात्र राहून काम करीत असताना दिलेली आश्वासने पाच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत असताना सर्व महिलांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे सौ. स्वाती हुडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना सौ. शिल्पा बनसोडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा देत पाच वर्षाच्या काळात उदगीरच्या विकासात आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. आ. संजय बनसोडे राज्य सरकारच्या माध्यमातून नगर परिषदेला मोठा निधी उपलब्ध करून देतील त्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता हैबतपुरे यांनी केले. आभार प्रा. मंगला विश्वनाथे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी योजना चनगे, ज्योत्स्ना समगे, सुनिता मदनुरे, विद्या पांढरे, ज्योती चौधरी, सरस्वती चौधरी, योजना चौधरी, ज्योती डोळे, सीमा तोंडचिरकर, प्रा. शकुंतला पाटील, श्रेया शिरशीकर, रेखा पाटील, उषा कुलकर्णी, प्रा सुनिता चवळे,शमीम शेख, किरण मुंडकर, अर्चना मानकरी, स्मिता पटवारी, आशा पोलावार यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!