संत तुकाराम लॉ कॉलेजच्या वतीने नीता मोरे यांचा सत्कार संपन्न

0
संत तुकाराम लॉ कॉलेजच्या वतीने नीता मोरे यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगीले) साने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर व राजीव गांधी नर्सिंग कॉलेज उदगीरच्या वतीने नीता मोरे यांचा सत्कार कॉलेजचे प्राचार्य राजकुमार नावंदर, उदगीर न्यायालयाचे न्यायाधीश भालचंद्र झेंडे, त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली झेंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक बलसूरकर, महेशसिंह बयास यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
नीता मोरे यांचा हळवा कोपरा हा कथासंग्रह महाराष्ट्र शासनाने पूरक वाचन साहित्य म्हणून निवडला आहे. तसेच एस सी ई आर टी पुणे मार्फत नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धेत तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक व विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून राज्यस्तरावर निवड झाली आहे. पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, ऍड. महेश मळगे, ऍड. सागर बिरादार, ऍड. देवानंद नामवाड, जोशी , कानूरे ,दंडिमे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!