चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या उदगीर शाखेत दिनदर्शिकेचे प्रकाशन

0
चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या उदगीर शाखेत दिनदर्शिकेचे प्रकाशन

उदगीर (एल पी उगिले)
चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर या संस्थेचे अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी उदगीर येथील शाखेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून उदगीर शहरात कार्यरत असलेल्या या शाखेने अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास नूतन नगरसेवक मनोजदादा पुदाले, नूतन नगरसेवक सय्यद जानीभाई, नूतन नगरसेवक हाश्मी इम्रोज, नूतन नगरसेवक ओम गाजुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पत्रकार सावळे श्रीधर, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य कलीम शेख व महताब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अनेक खातेदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गिरी गणेश, शेख लुखमान, बागवान युसुफ, शेख अथर, सोहेल जरगर, शेख ऐजास, शेख अमीर, शेख नवीद, शेख मुखीद, शेख खयुम, मोसीन बागवान, शेख रशिद, शेख सलिम, शेख जावेद, खान आवेज, पटेल खाजा, तांबोळी इफ्रान, कप्पीकरे नरेश, माधव पाटील आदींचा समावेश होता. याशिवाय चाकूर अर्बन संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्याचा गौरव करत संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक आर्थिक व्यवहार व विश्वासार्हतेच्या बळावर उदगीर शहरात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती सातत्याने होत असून भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दिनदर्शिका २०२६ ही माहितीपूर्ण, सामाजिक संदेश देणारी व संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेणारी असल्याने ती नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!