28 रोजी उदयगिरी महाविद्यालयात ‘विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन व माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

0
28 रोजी उदयगिरी महाविद्यालयात ‘विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन व माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी ‘विद्यार्थी कल्याण मंडळा’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा आणखी एक विशेष ठळक मुद्दा म्हणजे महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आणि नुकत्याच झालेल्या उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. ही महाविद्यालयासाठी आणखी एक अभिमानाची बाब आहे. या सर्व निवडून आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमासाठी विविध मान्यवर, माजी विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग तसेच उदगीर शहर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, विद्यापीठ प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!