रंगकर्मी साहित्य कला प्रतिष्ठांच्या वतीने नीता मोरे यांचा सत्कार

0
रंगकर्मी साहित्य कला प्रतिष्ठांच्या वतीने नीता मोरे यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले)
शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धेत विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक येऊन राज्यस्तराला स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षिका नीता मोरे यांचा रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

    नीता मोरे यांचा शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धेत तालुक्यात सर्वप्रथम येऊन, विभाग स्तराला सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. गडचिरोली येथील राज्यस्तरीय कथाकथन  स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. अनेक साहित्य संमेलनात व विविध विद्यालयामध्ये त्यांनी कथाकथन केले आहे. गुजगोष्टी, हळवा कोपरा, आम्ही नवदुर्गा असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.   
     रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा एकमत वृत्तपत्राचे पत्रकार बिभिषण मद्देवाड, रंगकर्मी प्रतिष्ठानच्या सचिव 

प्रा. ज्योती मद्देवाड,
सुप्रसिद्ध साहित्यिक कवी रामदास केदार, आदर्श शिक्षक लक्ष्मण बेंबडे,
मातृभूमी कॉलेजचे संस्थापक सतीश उस्तूरे, पत्रकार मनोहर लोहारे, सिद्धार्थ सूर्यवंशी,हनुमंत केंद्रे या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न झाला. शैक्षणिक, साहित्यिक सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!