छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या वार्षिक शिबिराचा समारोप संपन्न.

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या वार्षिक शिबिराचा समारोप संपन्न.

उदगीर (एल पी उगिले)येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबीर मौजे बामणी येथे पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील हे होते. तर प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे , डॉ. विष्णू पवार , डॉ.अनंत टेकाळे यांची प्रमुख विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मौजे बामणीचे सरपंच कै. राजकुमार बिराजदार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे म्हणाले, बामणी गावातील सर्व नागरिकांचे आमच्या शिबिरासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळेच आमचे विद्यार्थी आनंदाने उपक्रम राबवू शकले. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या, संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी डॉ.अतिष आकडे यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. हरीभाऊ ढगे यांनी केले. याप्रसंगी बामणी येथील ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या विशेष वार्षिक शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यक्रमाधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!