सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच महिला आज मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत – संजय दळवी

0
सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच महिला आज मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत - संजय दळवी

उदगीर (एल पी उगिले)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करून दिले म्हणून आजची स्त्री ही मोठ मोठे पद भुषवत आहे.ती राष्ट्रपती, अंतराळवीर, पोलीस,अभियंता,डॉक्टर, शिक्षीका आदी क्षेत्रातील मोठ मोठे पद भुषवत आहेत.असे गौरवोद्गार हाळी हंडरगुळी बिट चे बिट जमादार संजय दळवी यांनी काढले. ते वाढवणा बु येथील रामभाऊ म्हाळगी प्राथमिक आश्रम शाळेत आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षक्षीय पदावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांचे मैत्रीचे नाते असून समाजात कोणत्या वाईट घटना घडल्या तर बिनधास्त पोलिसांना कळवा, असेही सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधीज्ञ प्रमोद बिरादार हे होते.त्यांनी आपल्या मनोगतातून जमलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालकांना “पोस्को ” कायद्या विषयी सखोल माहिती सांगून पालक व शिक्षकांना विद्यार्थी व पाल्य यांना संस्कारी बनविण्याचा सल्ला दिला.ते पुढे म्हणाले की,सध्या माणुसाने माणुसकी संपविल्यामुळे असे दुष्कृत्य घडत आहेत असे सांगून ही मनोवृत्ती नष्ट करण्याची वेळ आली असून ती सर्वांनी प्रयत्न करून नष्ट केली पाहिजे, हे ही सांगितले.यावेळी माजी सरपंच बबन भांगे यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.तसेच येथील विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगते व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला कलकत्ते, वाडकर,तुकाराम बळदे, शिव प्रताप रंगवाळ आदी पोलीस कर्मचारी व माजी पं.स.सदस्य दत्ता बामणे,पालक प्रतिनिधी राम जगताप हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कलशेट्टी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!