समता संदेश पदयात्रा परिवर्तन घडविणारी – डॉ.राजशेखर सोलापुरे

0
समता संदेश पदयात्रा परिवर्तन घडविणारी - डॉ.राजशेखर सोलापुरे

उदगीर (प्रतिनिधी) समाजमाध्यमांवर व्यस्त असणाऱ्या लोकांना समाजातील सामान्य माणसांसोबत जोडत समतेचा विचार पेरत महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात वैचारिक अनुबंध जोडणारी समता संदेश पदयात्रा माणसांचे आंतरिक परिवर्तन करत आधुनिक मूल्यांची समाजाला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन लेखक व व्याख्याते डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.
कर्नाटकातील बसवकल्याण येथे समता संदेश पदयात्रेच्या तपपूर्ती (१२ वर्षे पूर्ण) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदयात्रेचे प्रमुख ॲड. शिवानंदजी हैबतपुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवकल्याण येथील मठाचे बसव देवरु, ॲड. बापुसाहेब मेटकरी, बसवराज कनजे, संजय पाटील, संतोष मलशेट्टी, हणमंत औरादे, भगवान चिवडे, नागेश जिवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. शिवानंद हैबतपुरे यांच्या नेतृत्वाखाली कुरुळा जि. नांदेड येथून शरण उरलिंग पेद्दी यांच्या जयंती निमित्त दिनांक २५ डिसेंबर २०२५ ला निघालेली पदयात्रा दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी कर्नाटकातील बसवकल्याण येथे पोहोचली. हजारो लोक या पदयात्रेत दरवर्षी सहभागी होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या या समता संदेश पदयात्रेला यावर्षी १२ वर्षे पूर्ण झाली. अखंडपणे समतेचा विचार रुजविणाऱ्या या पदयात्रेने समताधिष्ठित समाज उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे.
पुढे बोलताना डॉ.सोलापुरे म्हणाले की, लोकोन्नती हीच आत्मोन्नती झाली पाहिजे, तरच समाजातील विचारांचा दुष्काळ नष्ट होऊ शकेल. महात्मा बसवेश्वरांनी कल्याण येथे स्थायी अनुभव मंटप उभा केला. त्या अनुभव मंटपाचे फिरते रुप म्हणजे समता संदेश पदयात्रा आहे. शिवानंद हैबतपुरे यांनी सलग बारा वर्षे ही पदयात्रा आयोजित करुन नव्या समाजाला आकार देण्याचे कार्य केले आहे, असे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय भाषणात ॲड. शिवानंद हैबतपुरे यांनी पदयात्रेसाठी मदत करणाऱ्यांचे आभार मानत समता संदेश पदयात्रेला अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी विविध बसवरत्न, बसवभूषण, बसवप्रबोधनकार या पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता हैबतपुरे यांनी केले तर सूत्रसंचालन
निळकंठ पाटील ताकबीडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या व पदयात्रेच्या यशस्वितेसाठी बसवेश्वर गुडपे, विक्रम पटणे, मनोज राघो, सचिन तांबोळकर यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!