शास्त्री प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न.

0
शास्त्री प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न.

उदगीर(प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अंकुश मिरगुडे तर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेखा कुलकर्णी व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
सावित्री बाई फुले यांच्या वेशभूषेत काही विद्यार्थीनी उपस्थित राहिल्या व छान भाषणे केली.प्रमुख मार्गदर्शक सुरेखा कुलकर्णी बाई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात अंकुश मिरगुडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन खूप शिक्षण घ्यावे, व मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे जावे, असे सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली. सुत्रसंचलन श्रीमती सुनिता कांबळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!