5 जानेवारी रोजी उदगीर येथे कुस्त्यांची भव्य दंगल

0
5 जानेवारी रोजी उदगीर येथे कुस्त्यांची भव्य दंगल

उदगीर (एल पी उगिले) येथे प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी श्री गुरु हावगीस्वामी यात्रे निमित्य आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन,कृषी उत्पन्न बाजार समिती,उदगीर व नगर परिषद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य कुस्त्यांचं ”आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रचे उदघाटक आ. संजय बनसोडे हे राहणार आहेत, तर कार्यक्रमचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष स्वातीताई हुडे, बाजार समितीच्या उपसभापती प्रीतीताई भोसले, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, तहसीलदार राम बोरगावकर,प्रदीप जगताप, शिवाजी मुळे, कल्याण पाटिल, बाजार समितीचे सचिव प्रदीप पाटिल, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे,माजी उपनगरअध्यक्ष सुधीर भोसले, नगर सेवक मनोज पुदाले, नगर सेवक अनिल मुदाळे, मंजूरखा पठाण, डॉ तानाजी चंदावार, चंद्रकांत टेंगेटोल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान उदगीर तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर येथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी उदगीर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुस्त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कुस्त्यासाठी लातूर जिल्ह्यातील व कर्नाटका, आंध्र, तेलंगना येथील पैलवान तसेच हरियाणा, पंजाब चे पैलवान कुस्तीसाठी येणार आहेत, तसेच महिला कुस्ती सुद्धा होणार आहे. सर्व कुस्ती प्रेमिनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. असे आवाहन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे आणि आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष श्रीधर बिरादार व नागेश आंबेगावे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!