आ.संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे यांनी पदभार स्विकारला

0
आ.संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे यांनी पदभार स्विकारला

उदगीर (एल पी उगिले) : माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक – २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीचा दणदणीत विजयी होवुन थेट जनतेतून उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सौ.स्वाती सचिन हुडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या त्यामुळे त्यांचा काल दि.५ जानेवारी रोजी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ.स्वाती सचिन हुडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी आ.संजय बनसोडे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी शहरातील २० प्रभागातील ४० नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भगवानराव पाटील तळेगावकर, सुधीर भोसले, माजी नगरसेवक सचिन हुडे, मंजुर पठाण, ज्येष्ठ नागरिक शंकर हुडे, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे,अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आज पासून नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहून सेवा करावी व आपली नगर परिषद ही लातूर जिल्ह्यात नंबर एकची नगर परिषद म्हणून नावारुपाला आणावे असे आवाहन केले.जगाच्या नकाशावर आपल्या उदगीरची एक नवी ओळख निर्माण झाली असुन आपली संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी करावे. विकासाच्या कामासाठी हातात हात घालुन काम करा आणि शहरातील सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा पुरवा असे सांगितले. येत्या सहा महिन्याच्या आत नुतन इमारतीच्या कामाला सुरुवात करणार असुन एक भव्य दिव्य व देखणी इमारत आपण उभारणार असलचयाचेही आ.संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!