कै. तानाजी पाटील बामणीकर यांच्या स्मरणार्थ 51 रक्तदात्यांचे रक्तदान

0
कै. तानाजी पाटील बामणीकर यांच्या स्मरणार्थ 51 रक्तदात्यांचे रक्तदान

उदगीर (एल पी उगिले) कै. तानाजी पाटील बामणीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
स्व. तानाजी पाटील बामणीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेघा क्लिनिक, उमा चौक, उदगीर येथे डॉ. धनाजी कुमठेकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय जाधव यांनी केले तर आयएमएचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे नुतन अध्यक्ष उमेश पाटील आणि सहसचिव सुबोध अंबेसंगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगर परिषद सदस्य जवाहरलाल कांबळे,बंटी कसबे, शहाजी पाटील तळेगावकर, अमर सूर्यवंशी,नरसिंग शिंदे, बाळासाहेब पटोदे, डॉ.संजय कुलकर्णी,डॉ. प्रदीप जटाळे,डॉ.गोविंद सोनकांबळे, डॉ.श्रीकांत मध्वरे,राजू भंडे,राम मोतीपवळे,विजय काले, संजय क्षीरसागर,दत्ता आचवलकर, संजय खूळे,बाबा घुगे,अ‍ॅड.रमाकांत चटनाळे, साईनाथ चिमेगवे आणि व्यंकट महापूरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी स्व.तानाजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 51 जणांनी रक्तदान केले. आपल्या भाषणात डॉ. विजय जाधव म्हणाले, “आप्तेष्ट आणि मित्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिरे आयोजित करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. डॉ. कुमठेकर गेली वीस वर्षे रक्तदान शिबिरे घेत आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळाल्यास असंख्य जीव वाचू शकतात. रक्तदान हे सर्वोत्तम दान आहे.”आयएमए अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. धनाजी कुमठेकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी भोळे यांनी केले.

चौकट……

रक्तदानाचे अर्धशतक पूर्ण केलेल्यांचा सत्कार…….

उदगीर शहरातील प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सतत रक्तदान करणाऱ्यापैकी अमित क्लीनिक चे ख्यातनाम डॉक्टर दत्ता पाटील मादलापूरकर यांनी आत्तापर्यंत 62 वेळा रक्तदान केले आहे तसेच भारत एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुबोध आंबेसंगे यांनी 60 वेळा रक्तदान केले आहे तसेच कोमल मालपाणी यांनी 82 वेळा रक्तदान केले आहे. सतत रक्तदान करून रक्तदात्यांना प्रोत्साहन करणाऱ्या या रक्तदात्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार या समारंभामध्ये करण्यात आला.
अशा पद्धतीच्या रक्तदात्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, आणि प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन या रक्तदान शिबिराचे संयोजक डॉ. धनाजी कुमठेकर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!