आवड व क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे- डॉ गौरव जेवळीकर

0
आवड व क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे- डॉ गौरव जेवळीकर

उदगीर (एल पी उगिले) प्रत्येकात कांहीतरी क्षमता असतातच त्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे, व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौरव जवळेकर यांनी केले. ते मातृभूमी महाविद्याल महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उषा कुलकर्णी या होत्या. पुढे बोलताना डॉ जेवळीकर म्हणाले की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी” आणि “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका,” हे दोन महान विचार ज्यांच्या आयुष्याचे सार आहेत, अशा दोन थोर व्यक्तींना आज आपण वंदन करण्यासाठी येथे जमलो आहोत.
सर्वात आधी आपण वंदन करूया जिजाऊ माँसाहेबांना. जिजाऊ केवळ शिवबांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार होत्या. ज्या काळात चहूकडे अंधार होता, परकीयांचे अत्याचार होते, त्या काळात त्यांनी शिवबांना केवळ युद्धाचेच नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि नीतिशास्त्राचे संस्कार दिले. त्यांनी मनात स्वराज्य उभारण्याचे स्वप्न पेरले, म्हणूनच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ मिळाले.
दुसरीकडे, स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची पताका संपूर्ण विश्वात फडकवली. १८९३ च्या शिकागो धर्मपरिषदेत त्यांनी “माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो” अशी सुरुवात करून भारताच्या विशाल हृदयाची ओळख जगाला करून दिली. स्वामीजींचे विचार आजही तरुणांसाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. ते म्हणायचे, “स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.”
मित्रांनो, जिजाऊंनी आपल्याला ‘कर्तृत्व’ शिकवले, तर स्वामीजींनी आपल्याला ‘आत्मविश्वास’ दिला.आजच्या युवकांसाठी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बिभिषण मद्देवाड यांनी तर आभार प्रा रणजीत मोरे यांनी मानले केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. शिवांगी वट्टमवार, प्रा. अन्वेश हिपळगावकर, प्रा. जाई शर्मा, प्रा. दीक्षा स्वामी, प्रा. काकरे प्रतीक्षा, प्रा. मीरा पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा. नेहा वाघमारे, ग्रंथपाल उषा सताळकर, जगदिशा ओंकारे, काळे अस्विनी, मादळे प्रदीप, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, प्रकाश गायकवाड, मुबारक पटेल, अर्चना बिरादार व देवानंद डोंगरे यांच्यासह शिक्षक शिक्षेत्तर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!