पोलीस अधिकाऱ्याचाच मोबाईल हिसकावून नेला!!

0
पोलीस अधिकाऱ्याचाच मोबाईल हिसकावून नेला!!

गुन्हे प्रकटीकरण शाखेने चांगला झटका दिला !!

लातूर (एल पी उगिले) शहरात मोबाईल चोरी व मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांवर आळा घालण्या साठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली ही कारवाई अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण, गोपनीय माहिती आणि जलद कारवाईच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले असून, मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी नामे बाळासाहेब विष्णु डोंगरे (वय ४० वर्षे, रा. शासकीय पोलीस वसाहत, एमआयडीसी, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गु.र.नं. 22/26 कलम 304(2),3(5) बीएनएस अन्वये दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची हकिगत अशी की, दिनांक १८/०१/२०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले असता, जुनी एमआयडीसी परिसरातील रस्त्यावरून चालत असताना त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा एस 25 अल्ट्रा मोबाईल फोन, किंमत अंदाजे1,12 ,500 रुपये, दोन अनोळखी इसमांनी हिसकावून पळ काढला होता. त्या संदर्भात गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण स्टाफ व पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. सदर फुटेजचे सखोल विश्लेषण करून आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्याचप्रमाणे गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. त्यामध्ये विकास बाळु राठोड, (वय २२ वर्षे, रा. कानडी बोरगाव, ह.मु. विकास नगर, लातूर),प्रजापती मुरलीधर सोनवणे, (वय ४५ वर्षे, रा. वाल्मीकीनगर, लातूर),तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी क्र. 2 प्रजापती मुरलीधर सोनवणे हा संविधान चौक, लातूर येथील सत्यम मोबाईल शॉपचा मालक असून, चोरीस गेलेल्या मोबाईलचे पॅटर्न लॉक तोडणे, डेटा क्लिअर करणे तसेच ते पुन्हा विक्रीयोग्य बनवून देणे अशा प्रकारे तो गुन्ह्याच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेत होता. त्यामुळे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना व्यावसायिक स्वरूप देण्याचे काम तो करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपींकडून फिर्यादीचा हिसकावून नेलेला मोबाईल, इतर 16 मोबाईल फोन (किंमत अंदाजे 2,50,000 रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल,मोबाईल लॉक तोडण्यासाठी वापरण्यात आलेला कॉम्प्युटर संच,असा एकूण सुमारे4,57,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून, जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या आधारे संबंधित मोबाईल धारकांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
ही संपूर्ण कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार, डीबी पथकाचे सपोउपनि भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के, रामभाऊ जाधव, अक्षय डिगोळे, विश्वनाथ डोंगरे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!