सकल जंगम समाज च्यावतीने नगराध्यक्ष व नगर सेवकांचा सत्कार

0
सकल जंगम समाज च्यावतीने नगराध्यक्ष व नगर सेवकांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले) सकल जंगम समाजच्यावतीने उदगीर,मोहोळ,व मैदर्गी नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्षा व नगर सेवकांचा सत्कार डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचे हस्ते संपन्न झाला.
सकल जंगम समाज उदगीरच्या वतीने रेणूकाचार्य संस्कार भवन येथे श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधिश डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्यादिव्य सानिध्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शंकरलिंग मठाचे मठाधिश सुखदेव स्वामी, माजी मंत्री आ.संजय बनसोडे ,महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटिल नागराळकर तर सत्कार मुर्तीमध्ये उदगीर च्या नगराध्यक्षा सौ .स्वातीताई सचिन हुडे, मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु.सिध्दी वस्रे, मैदर्गी नगर परिषद नगराध्यक्षा सौ. अंजलीताई बाजामठ,लातूर महानगर पालिकेचे नगर सेवक मठपती, निलंगा न.प.चे गट नेता विरभद्र स्वामी ,उदगीर नगर परिषदेच्या नगरसेविका गंगाबाई कपाळे ,सौ. निकिता अंबरखाने, सौ.शिल्पा उप्परबावडे,सौ.संध्या गांजूरे , नगर सेवक विजयकुमार निटुरे,चंदन पाटिल नागराळकर, नागेश अष्टुरे, राजकुमार हुडगे, अनिल मुदाळे,आदि उपस्थित होते.
प्रारंभी आद्य जगदगुरु रेणूकाचार्य यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व दिपप्रज्वलनाने उदघाटन झाले.
यावेळी डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते नगराध्यक्ष व नगरसेवकांचा आद्य जगदगुरु रेणूकाचार्य यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकात सकल जंगम समाजाचे अध्यक्ष विजयकुमार स्वामी यांनी सत्कार कार्यक्रमामागील भुमिका व रेणुकाचार्य संस्कार भवन बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल सादरकरुन वाढिव निधीची मागणी केली.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले की, गुरुवर्यांच्या अशिर्वादानेच मला दुसऱ्यांदा जनसेवेची संधी मिळाली असुन सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत असताना सर्वजातीधर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सकल जंगम समाजाने रेणुकाचार्य संस्कार भवन निर्माणासाठी निधीची मागणी केली. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे १ कोटी रुपयाचा निधी दिला.उर्वरित कामासाठी अधिक १ कोटी रुपयाचा निधी जाहीर करुन अधिक निधी लागल्यास तो देण्याचे वचन दिले. निवडुन आलेल्या नगरसेवक, महापौरांनी जनतेच्या मुलभूत प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी अधिक लक्ष द्यावे असे सांगुन मोहोळ , मैदर्गी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. स्वातीताई सचिन हुडे, महोळ जि. सोलापूरच्या नगराध्यक्षा कु. सिध्दी वस्त्रे ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी बस्वराज पाटील नागराळकर, नगरसेवक दिलीप मठपती, योगीनाथ बाजारमठ यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन शिवसांब स्वामी यांनी तर आभार गणेश मठपती यांनी मानले. या कार्यक्रमास उदगीर शहर व तालुक्यातील सकल जंगम समाजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव मल्लिकार्जुन स्वामी, उपाध्यक्ष शांतवीर कनाडे स्वामी, कोषाध्यक्ष नागनाथ स्वामी, सहसचिव शिवराज स्वामी, सहकोषाध्यक्ष मनोहर स्वामी, कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन स्वामी, कार्यकारणी सदस्य अॅड. गंगाधर स्वामी, महालिंग देवर्षे, सिद्राम स्वामी, शांतवीर स्वामी, नागनाथ स्वामी, शशिकांत स्वामी, विरभद्र स्वामी, सन्मुख कनाडे, लक्ष्मीकांत स्वामी, अशोक स्वामी, राजु पडसलगे यांच्यासह सकल जंगम समाजाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!