छ्त्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
उदगीर (एल पी उगिले) येथील
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
डॉ.मांजरे यांनी यावेळी दोन्ही महामानवांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. समाजासाठी त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे असे म्हटले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक संयोजन समिती सदस्य डॉ.डी.बी.मुळे यांनी केले. सदरील कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
