अनिता यलमटे ‘मृदगंध’ पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल पी उगिले) येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या सदस्या व लेखिका, सावित्रीबाई फुले स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी श्रीमती अनिता यलमटे यांना, भारत मल्टीपरपज एज्यु. सोसायटी तर्फे सुलोचनाबाई पुंडलिकराव नादरगे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘मृदगंध’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका अंजलीताई बनशेळकीकर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथराव मुडपे गुरुजी ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक) , प्राचार्य डॉ. बाबुराव लहाने ( संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोट ),रमाकांतराव बनशेळकीकर गुरुजी ( सेवानिवृत्त आदर्श शिक्षक) , अरुणाताई भिकाणे ( सामाजिक कार्यकर्त्या ) , त्रिवेणीबाई नादरगे, वैशालीताई शंकपाळे, देविदासराव नादरगे ( सचिव, भा.म. एज्यु.सोसायटी, नळगीर) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सुलोचनाबाई पुंडलिकराव नादरगे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव देविदासराव नादरगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांनी अनिता यलमटे यांच्या कार्याचा गौरव केला व ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातत्याने अनिता यलमटे यांचे लिखान चालू असल्याचे म्हटले, तसेच त्यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले.
सत्कारमूर्ती अनिता यलमटे बोलताना म्हणाल्या की, कृषी संस्कृती हा ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहे. ग्रामीण भागातील सर्व सण,कृषी पूजन व कृषी उत्सवाचा एक भाग आहे.
अध्यक्षीय समारोपात अंजलीताई बनशेळकीकर यांनी माता पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई पाटील यांनी केले, तर आभार प्रफुलता बोडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता शिंदे, आम्रपाली सोमवंशी ,ज्ञानोबा कुंडगिरे, शशिकुमार पाटील, गोविंद रावळे ,विठ्ठल नादरगे, प्रशांत पांचाळ, रोहित बिराजदार यांनी परिश्रम घेतले.
