विकास कामे करण्याची क्षमता असणाऱ्या प्रा. शिवाजीराव मुळे यांनाच मतदान करा- – सभापती शिवाजीराव हुडे
उदगीर( एल पी उगिले ) विकासाची कामे करुन घेणाची क्षमता असणाऱ्या व 20 वर्षांपासून प्रशासकीय अनुभव असणाऱ्या कांग्रेस आघाडी चे तोगरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रा.शिवाजीराव मुळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कांग्रेस चे नेते शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केले आहे.
तोगरी जिल्हा परिषद चे कांग्रेस आघाडी चे उमेदवार प्रा.शिवाजीराव मुळे व दावणगाव पचायत समितीचे गणाचे उमेदवार सुनीता चंद्रप्रकाश खटके यांच्या प्रचारत बनशेळकी येथे आयोजित छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे हे होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, तोगरी जिल्हा परिषद चे उमेदवार प्रा. शिवाजीराव मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश खटके, यांच्यसह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद चे उमेदवार उमेदवार प्रा. शिवाजीराव मुळे, माजी जिल्हा परिषद सदयस चंद्रप्रकाश खटके यानी आपले विचार व्यक्त केले.
पुढे बोलताना हुडे म्हणाले कि, मुळे व त्यांचा समोर थांबलेल्या उमेदवार यांची तुलना करा, मुळे यांना प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांनी पंचायत समितीच्या उपसभापती व सभापती पदावर काम करुन जनतेचे मोठ्या प्रमाणावर विकास काम केले आहेत.म्हणूनच सक्षम असणारे व आपल्या गटात काम खेचून आणणारे शिवाजीराव मुळे यांना आपले अमूल्य मत येणाऱ्या सात तारखेला हात चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन शिवाजीराव हुडे यांनी केले आहे.
