ओंकारेश्वर महादेव मंदिरात परमरहस्य ग्रंथाचे पारायणास प्रारंभ
उदगीर (एल पी उगिले) येथील
ओंकारेश्वर महादेव मंदिरात पमरहस्य ग्रंथ पारायणास प्रारंभ झाला आहे.
नविन वसाहत नळेगाव रोड मलकापुर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात परमरहस्य ग्रथाचे पारायणास प्रारंभ झाला. पारायणास
यावेळी प्रा.डाॅ. मल्लेश झुंगास्वामी यांनी प्रवचनात परमरहस्य ग्रंथाची महती सांगताना म्हणाले की, परमरहस्य ग्रंथाने भक्तीचा मार्ग दाखवला,भक्तीतुन अक्षय शक्ती निर्माण होते.
ज्या ज्या वेळी महिला शक्ती ऐकत्रित येते तेव्हा क्रांती होते, महिला भजनी मंडळांनी ओंकारेश्वर मंदिर निर्माणाचा संकल्प केला आणि एक वर्षात ते काम पुर्ण केले. काम करण्याचा निर्धार केला तर त्यास कोणीही रोखू शकत नाही, असे सांगून महिला भजनी मंडळाचा गौवरव केला. अन्नदाते उद्दोजक सौ.दिपा रविंद्र साकोळकर व शिरुर अनंतपाळ न.प.च्या माजी अध्यक्षा सौ.माया मनोज धुमाळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
शिवकिर्तन शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे यांचे “तोची दैवाचा पुतळा मुखी ज्याचे नाम माळा” या अभंगावर शिवकिर्तन संपन्न झाले. शि.भ.प. अनिल स्वामी शेवाळकर यांचे किर्तन तर प्रवचन सौ.इरम्माताई कवडगावे यांचे होणार आहे.यावेळी महिला भजनी मंडळाच्या श्रीमती सुनिता कड्डे, सौ.मिना हालकुडे, मंजुतिई कप्ते,उमादेवी कमठाणे,सौ.जगदेवी स्वामी,देविदास बिरादार,वैजनाथ माळेवाडे,महादप्पा स्वामी, सूर्यकांत साखरे हे परिश्रम घेत आहेत.
