आरती अशोक तोंडारे हीने कठोर परिश्रम करून ध्येय प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करून अर्थसहाय्य

0
आरती अशोक तोंडारे हीने कठोर परिश्रम करून ध्येय प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करून अर्थसहाय्य

उदगीर (एल पी उगिले) येथील प्रेस फोटोग्राफर तथा संपादक अशोक तोंडारे यांच्या सुकन्याने मोठ्या जिद्दीने आणि परिश्रमाने अभ्यासात यश मिळवत पुणे येथील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे. प्रेस फोटोग्राफर चा व्यवसाय सध्या म्हणावा तशा गतीने चालत नसल्याने अशोक तोंडारे यांच्यापुढे अनेक आर्थिक समस्या निर्माण झालेल्या होत्या. मात्र उच्च विद्या विभूषित होण्याचे मुलीचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, या जिद्दीने त्यांनी आपल्या मुलीला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला आहे. पुढील शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे या संदर्भात विचारणा केली होती. सर्व नाटके करता येतात पण पैशाचे नाटक करता येत नाही, या गोष्टीची जाणीव असलेल्या उदगीर येथील जिव्हाळा ग्रुपने आरती तोंडारे या विद्यार्थिनीला 25 हजार रुपये रोख बक्षीस स्वरूपात देऊन तिचा सत्कार केला. पुढील वाटचालीसाठी प्रेरणा व आशीर्वाद दिला.
मंझिले उन्हि को मिलती है , जिनके सपनो मे जान होती है,
पन्ख से कुछ नही होता, होसले से उडान होती है.
जिव्हाळा ग्रुप दरवर्षी अशा अनेक
होतकरू मुलींचा,कर्तबगार महिलांचा
सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतो.
महिला सबलीकरणासाठी
जिव्हाळा ग्रुपचे हे कार्य
इतरांसाठी अनुकरणीय आहे. शहरातील सेवाभावी नागरिकाकडून जिव्हाळा ग्रुपचे ही कौतुक करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!