जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या युतीच्या उमेदवारांनाच विजयी करा – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगिले) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीने जनतेच्या मनातील उमेदवार दिले आहेत. सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला भविष्यातील सर्व मुलभुत सोयी – सुविधा पुरविण्यासाठी तोगरी जिल्हा परिषद गट व तोगरी, दावणगाव गणातील युतीच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवुन आपल्या कामाच्या माणसाला साथ द्या. असे आवाहन राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे.
ते तोगरी जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर बिरादार व दावणगाव पंचायत समिती गणातील सौ. कोमल फुले व तोगरी पंचायत समिती गणातील उमेदवार प्रकाश बिरादार यांच्या प्रचारार्थ बनशेळकी ता. उदगीर येथे बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपसभापती रामराव बिरादार, नगरसेवक सचिन हुडे, सुधीर भोसले, धनाजी मुळे, मनोहर भंडे, नरसिंग शिंदे, अनिल मुदाळे, बाळासाहेब पाटोदे, गिरीष उप्परबावडे, महेश बिरादार, बनशेळकीचे सरपंच विकास शेळके, गुरुनाथ बिरादार, उमाजीराव मुळे, प्रल्हाद महाजन, किशन बिरादार, कालिदास भंडे, सारंग लोहारे, सय्यद बाबर, नागेश आंबेगावे, शिवकांत स्वामी, इस्माईल चाँदसाब, रमेश भंडे, चंद्रकांत बिरादार, कमलाकर फुले, बस्वराज आंबेगावे, रोहिदास लोहारे, उमाकांत आबेगावे, लक्ष्मीबाई श्रीमंडळे, पार्वती भंडे, सत्यभामा आंबेगावे, सय्यद बशीर, अशोक कांबळे, शुभम पांचाळ, महादेव पाटील, संकेत बिरादार, शिवलिंग भेदे, महादेव बिरादार, विकास बनशेळकीकर, सय्यद ईसराईल,बाबुराव मलकापुरे,एकनाथ सूर्यवंशी, सतीश मचकुरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीचे सर्व उमेदवार हे
जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले उमेदवार आहेत. भविष्यात तोगरी गटाचा विकास करण्यासाठी हे उमेदवार कटीबध्द राहणार असुन जाती – पातीचा विचार न करता विकासावर मत द्या. असे सांगून मी उदगीर मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते केले. पाणीपुरवठा खात्याचा राज्य मंत्री म्हणून कारभार पाहताना जलजीवन मिशन योजना मंजूर करुन आणली.नंतरच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या काळात वाटरग्रीड योजना व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. शेतक-यांना दिवसा विज देण्याचा माझा मानस होता, म्हणून मतदार संघात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे प्रकल्प आणले. त्यामुळे आता शेतक-यांना दिवसा विज मिळत आहे.
ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देवून मतदार संघाचा चौफेर विकास केला.
सर्व जाती धर्माच्या लोकांना विविध सभागृह बांधुन दिले. जनतेला मूलभूत सुविधा पुरविल्या सर्वांना सोबत घेवुन मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. यापुढे ही तो विकासाचा रथ आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यासाठी युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आ.संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी बनशेळकीसह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
