भक्ती रसातून अध्यात्मा सोबतच प्रबोधनही केले जगदेवीताईंनी मलकापुरवासीयांचे लक्ष वेधले

0
भक्ती रसातून अध्यात्मा सोबतच प्रबोधनही केले जगदेवीताईंनी मलकापुरवासीयांचे लक्ष वेधले

उदगीर (एल पी उगिले) शि.भ.प. सौ.जगदेवी झुंगास्वामी यांचे समाज प्रबोधन पर भारुड व लोकगीताने उपस्थित भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले.
ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग व नंदी प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा निमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. सोमवार दि.2 फेब्रुवारी रोजी भारुडाच्या माध्यमातून .शि.भ.प. सौ.जगदेवीताई झुंगास्वामी यांनी शिवपार्वती सजिव देखाव्यासह भारुडातून अंधश्रध्देवर प्रहार करत शिव भक्ती चे महत्व सांगत “अशी पार्वती बावरी झाली गं शिवशंभोची नवरी झाली गं हे महादेवाचे पद”, “डोळे भरुनीया त्या मन्मथाला पाहू, संत शिरोमणी मन्मथ स्वामींचे पद”,तर भारूड एवढं केलं नथीच्या पाई,केसारी सुया गं,बुरगुंडा, रडू नको बाळा” आदी समाज प्रबोधन लोककला सादरीकरणाने उपस्थित शिवभक्त रममान झाले होते. यात शंकराच्या वेशभुषेत सौ.मिना हलकुढे , पार्वतीच्या विषभुषेत सौ.जगदेवी झुंगा स्वामी तर गंगा च्या वेशभुषेत सौ.शालू सोनटक्के यांनी सहभाग घेतला.
यावेळी अन्नदाते सौ.वनमाला अशोक कप्ते, शिवराजप्पा स्वामी,उदय कप्ते यांचे हस्ते आरती संपन्न झाली.यावेळी गुरु मठाचे मठाचे मठाधिश डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशिर्वचनात शिव भक्तीचे महत्व सांगून ओंकारेश्वर मंदिराचे वैभव भक्ताच्या योगदानातून निर्माण झाले आहे,असे सांगीतले.
दररोज शिवपाठ रिंगन सोहळ्यात महिला पुरुषानी सहभाग घेऊन शिवपाठ रिंगन सोहळ्यात तल्लिंन झाले होते.शिवनाम सप्ताहात वादक कपिल तलखेडकर,गायक भिमाशंकर भुरे शिराढोण, संजय चव्हाण लाळी व योगेश इंगळे राजूळा यांनी सहभाग घेतला . सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवराज माळेवाडे,राम मोतीपवळे, बाबुराव भंडे, महादेव स्वामी, पंचाक्षरी मठदेवरु, भानुदास जाधव, राहुल जाधव,सुर्यकांत साखरे, देविदास बिरादार ,दिगंबर बिरादार,रणधिर जाधव, राम मंगरुळे, अशोक कप्ते, अभुमण्यु हलकुडे, निलेश मंगरुळे, राजकुमार धानुरे ,महेश तोडकर,सुज्ञान गलबले, विष्णूकांत हलबुर्गे, सौ.शिला धानूरे यांच्या सह एस.टी.काॅलनी मधिल महिला, पुरुष परिश्रम घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!