हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करून ते रुजवण्याची जबाबदारी पालकांची. – व्यंकटराव पनाळे
लातूर (एल पी उगिले) विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवशीय महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलताना लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे म्हणाले की, आपण सर्वांनीच आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करण्याचे संस्कार केले पाहिजेत. आणि ती जबाबदारी सर्व पालकांची आहे. असे प्रतिपादन लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
हरंगुळ (बु.) येथील बार्शी रोडवरील उड्डाण पुलाजवळ असलेल्या विश्वकर्मा नगर मधील श्री. विश्वकर्मा मंदिर येथे श्री. विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीने ३ दिवसाचा विराट विश्वकर्मा प्रगट दिन जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता.
हरिभक्त परायण शाम पांचाळ महाराज सताळकर यांचे श्री विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे कीर्तन संपन्न झाले. गुलालाचा कार्यक्रम आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना शिवाजी तुकाराम लोहार पांचाळ जानवळकर व सौ. रत्नाबाई शिवाजी लोहार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलत असताना व्यंकटराव पनाळे म्हणाले की, काही धर्मांध लोक हिंदू मुलींना वेगवेगळे आमिष आणि प्रलोभने दाखवून वाम मार्गाला लावून धर्मांतर करून घेत आहेत. लव्हजिहाद नावाखाली अत्यंत घातक प्रकार चालू आहेत. त्यामुळे पालक आणि विशेषता महिला पालकांनी आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार रुजवणे गरजेचे असून आपल्या पालकावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पनाळे यांनी सांगितले.
विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित महोत्सवात लोकाधिकार प्रमुख तथा हरंगूळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे, हरिभक्त परायण शाम पांचाळ महाराज सताळकर आणि राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष जगनाथराव लोहारे, भास्कर विश्वकर्मा, वसंतराव पोतदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काही गुणवंताचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानराव पांचाळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विश्वकर्मा देवस्थान समितीचे अध्यक्ष जगन्नाथराव लोहारे, उपाध्यक्ष भगवानराव पांचाळ, सचिव माधवराव पांचाळ, कोषाध्यक्ष मारुतीराव सुवर्णकार, सहसचिव रंगनाथ सुतार, कार्यकारणी सदस्य संग्राम पांचाळ, राजपाल पांचाळ, श्रीमती शोभा पांचाळ, भास्कर विश्वकर्मा, बळीराम पांचाळ, अमर पांचाळ, गोपाळ पोतदार, दिलीप पोतदार, बालाजी पांचाळ, नामदेव पांचाळ, भगवानराव सुतार तसेच सभासद प्रल्हादराव पांचाळ, वसंतराव पोतदार, भगवानराव पोतदार, बाबुराव पांचाळ, दत्तात्रय सोनार, नरसिंह पोतदार, रवि लोहारे, लक्ष्मीकांत पोतदार, शांतलिंग लोहारे, रविंद्र पोतदार, एम. व्ही. कंबार, विष्णु पांचाळ, दुष्यंत पोतदार, नागनाथ पांचाळ, डॉ. रामभाऊ पांचाळ, चक्रधर पांचाळ, अमृत पांचाळ, भगवानराव पांचाळ, सतीष पांचाळ, प्रशांत विरब्रम्हा पांचाळ, मुरलीधर पांचाळ, प्रभाकर पांचाळ, शिवकुमार पांचाळ, दत्ता पोतदार, ऋषीकेश पोतदार, गोपाळ विश्वकर्मा, गणेश पोतदार, राघव पांचाळ, शिवकुमार सोनार, हिमालय पांचाळ तसेच महिला सदस्य पार्वतीबाई वसंतराव पोतदार, लक्ष्मीबाई वामनराव पोतदार, बबिता दिलीपराव पोतदार, रुक्मिणीबाई शेषेराव सुवर्णकार, सरिता रवि लोहारे, अश्विनी नरेंद्र पांचाळ, उज्वला रविंद्र पोतदार, शोभा नामदेवराव पांचाळ, रेखा विष्णु पांचाळ, प्रभावती भगवानराव सुतार, जयश्री भास्करराव विश्वकर्मा, तारामती चंद्रकांत पांचाळ, भक्ती भगवान पांचाळ, कांताबाई हरिश्चंद्र चिंचाळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
