नळगीर जिल्हा परिषद निवडणुकीतविजयी झालेल्या रूपाली गायकवाड यांची भव्य मिरवणूक
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नळगीर चे युवा नेते ग्राम पंचायत सदस्य प्रशांत विश्वनाथ गायकवाड यांच्या पत्नी सौ. रूपाली प्रशांत गायकवाड या प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांची उदगीर शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे नेते तथा बाजार समितीचे संचालक विधीज्ञ पद्माकर उगिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाल्यामुळे त्यांनीही या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला. उमेदवार रूपाली गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
